मोदी सरकार अदानीच्या चर्चेपासून दूर पळत आहे, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांची टीका

अदानी प्रकरणी मोदी सरकार चर्चेपासून पळ काढत आहे अशी टीका काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी त्यांनी खासदारांसोबत आंदोलन केल्याचेही सांगितले.

एक्सवर पोस्ट करून प्रियंका गांधी म्हणाल्या की, देशाच्या जनतेची इच्छा आहे की अदानी प्रकरणी संसदेत चर्चा व्हावी. इंडिया आघाडीसोबत सर्व पक्षाच्या खासदारांनी अदानींसदर्भात चर्चा करण्याची मागणी केली. सर्व मर्यादा तोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने अदानीच्या भ्रष्टाचाराचा बचाव करत आहेत ते अतिशय आश्चर्यकारक आहे असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.