अदानींवरून प्रश्न का नाही उपस्थित करायचा? असा सवाल काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी विचारला आहे. तसेच भाजप नेत्यांना अदानींवर चर्चा करायला भिती वाटते अशी टीकाही गांदी यांनी केली.
संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, भाजप नेत्यांना अदानींवर चर्चा करायला भिती वाटते. कारण चर्चेनंतर सर्व गोष्टी बाहेर येतील म्हणून ते या चर्चेतून पळ काढत आहेत. मी नुकतीच खासदार झाले आणि संसदेत आले पण अजून पंतप्रधान मोदी संसदेत आलेच नाहीत. गेल्या 10 दिवसांपासून सत्र सुरू आहे. ही आश्चर्यजनक बाब आहे. अदानींवरून प्रश्न का नाही उपस्थित करायचा? लोकांना मोठ मोठी लाईट बिलं येत आहेत, उत्तर प्रदेशमध्ये जा आणि बघा शेतकरी काय म्हणत आहेत. शेतकऱ्यांना एवढे मोठे लाईट बिल का येत आहेत. अमेरिकेत अदानींवर काय आरोप आहेत. अदानींनी हजारो कोटी रुपयांची लाच दिली आहे कारण जनतेचे लाईट बिल यांना वाढावायचे होते. लोकांना जी वीज विकली जात आहे ती महागात विकली जावी म्हणून ही लाच दिली गेली. हे प्रश्न आम्ही का नाही उपस्थित करायचे असेही गांधी म्हणाल्या.