राजामौलीच्या चित्रपटात ‘देसी गर्ल’

आज जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवलेली प्रियांका चोप्रा हिलाही कधीकाळी तिच्या रंगावरून टीका सहन करावी लागली आहे. ती अमेरिकेत असताना तिच्या रंगावर टिप्पणी केली गेली होती.

राजामौली यांच्या आगामी ‘एसएसएमबी29’ या चित्रपटात देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्रा दिसणार आहे. या चित्रपटात महेश बाबू मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाद्वारे प्रियांका पाच वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहे. एसएस राजामौली सध्या महेश बाबूसोबत ‘एसएसएमबी29’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात प्रियांका, महेश बाबू यांच्यासह आणखी कोण कोण असणार आहे, हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही.