
प्रिया बापटने बाॅडीकाॅन ऑफ शोल्डर गाऊनमध्ये नुकतेच एक फोटोशूट केले आहे. सिल्व्हर रंगाच्या या गाऊनमध्ये, प्रियाच्या दिलखेचक अदांनी इंटरनेटचं तापमान चांगलंच वाढवलं आहे. प्रियाने केलेल्या या फोटोशूटवर प्रियाच्या चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. प्रियाने फ्रंट स्लिट बाॅडीकाॅन ऑफ शोल्डर गाऊनमध्ये केलेले हे फोटोशूट अनेकांच्या पसंतीस पडत आहे.