पृथ्वी, सोशल मीडियापासून दूर रहा, वॉटसन-पीटरसनचा मोलाचा सल्ला

सहा-सात वर्षांपूर्वी दुसरा तेंडुलकर म्हणून ज्याच्याकडे पाहिले जात होते त्या धडाकेबाज पृथ्वी शॉचा ढासळलेला खेळ पाहून अनेक दिग्गजांना काळजी वाटू लागलीय. त्यामुळे पृथ्वी फक्त स्वतःला सोशल मीडियापासून दूर ठेव, असा मोलाचा सल्ला इंग्लिश फलंदाज केविन पीटरसनने ‘एक्स’’वर पोस्ट करून दिला आहे.

पीटरसनने ‘एक्स’वर पृथ्वी शॉसंदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. त्याने तो म्हणाला, ‘सर्वात महान क्रीडा जगतातील कथांमध्ये काही पुनरागमनाच्याही कथा आहेत. जर पृथ्वीच्या आसपास काही चांगली मंडळी असतील, ज्यांना त्याच्या कारकीर्दीची काळजी वाटत असेल ते त्याला आपल्या जवळ प्रेमाने बसवतील आणि सोशल मीडियापासून दूर जाण्याचा सल्ला देतील आणि त्याला पुन्हा सुपर बनवण्यासाठी त्याची जोरदार टीका करतील. याच गोष्टी त्याला योग्य मार्गावर आणतील. तेथूनच त्याला यश पुन्हा मिळवता येईल.