पंतप्रधान मोदी आज कुंभमेळ्यात;  अडीच कोटी भाविकांचे पवित्र स्नान

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, बुधवारी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला भेट देणार असून सकाळी 11 वाजता संगमावर पवित्र स्नान करतील. त्यानंतर ते गंगा मातेची पूजा करतील. हिंदुस्थानच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा प्रचार करण्याच्या दृष्टीने मोदी यांनी तीर्थक्षेत्रावरील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी सातत्याने पावले उचलली आहेत, असे पंतप्रधान कार्यालयाने निवेदनाद्वारे म्हटले. मौनी आमावस्येच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सोमवारी वसंत पंचमीच्या दिवशी 2.5 कोटीहून अधिक भाविकांनी महाकुंभमध्ये ’अमृत स्नान’ स्नान केले. यावेळी संगम घाटावर नागा साधू, संत आणि सामान्य भाविकांच्या स्नानादरम्यान हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.