पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा विदेश दौऱ्यावर जाणार

‘एनडीए’च्या पाठिंब्यावर नरेंद्र मोदी हे तिसऱयांदा पंतप्रधान झाले आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांचे विदेश दौरे सुरू झाले आहेत. इटलीचा दौरा केल्यानंतर आता पंतप्रधान मोदी आणखी तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 8 आणि 9 जुलैला मोदी रशियाच्या दौऱयावर जाणार आहेत. या दौऱयानंतर मोदी व्हिएन्नाचा दौरा करणार आहेत. इंदिरा गांधी यांच्यानंतर मोदी हे व्हिएन्ना करणारे दुसरे पंतप्रधान ठरतील. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1983 साली व्हिएन्ना दौरा केला होता. या दोन देशांनंतर मोदी ऑस्ट्रिया या देशाचाही दौरा करणार आहेत. परंतु, यासंबंधी परराष्ट्र खात्याकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. पंतप्रधान मोदी यांनी 2014 ते 2019 या काळात 57 देशांचे एकूण 92 दौरे केले. तर 2019 ते 2024 पर्यंत 28 देशांचे एकूण 43 देशांचे दौरे केले. पंतप्रधान मोदी हे सर्वात जास्त 8 वेळा अमेरिका दौऱयावर गेले. मोदी हे 25 वर्षांत सर्वात जास्त परदेश दौरे करणारे हिंदुस्थानी पंतप्रधान ठरले आहेत.