पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 एप्रिलला श्रीलंका दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 एप्रिलला श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी शनिवारी संसदेत याबाबत माहिती दिली. श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिथा हेरथ यांनी मागील आठवड्यात सांगितल्यानुसार, गतवर्षी राष्ट्रपती दिसानायके यांच्या हिंदुस्थान दौऱ्यादरम्यान झालेल्या करारांना अंतिम स्वरूप देण्यासाठी मोदींचा हा दौरा असेल. मोदींच्या भेटीदरम्यान त्रिंकोमालीच्या पूर्वेकडील समपूर पॉवर प्लांटचे बांधकाम सुरू होणार असल्याचेही दिसानायके यांनी सांगितले.