पुन्हा कोटींच्या कोटी उड्डाणे! पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार

2014 पासून पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेश दौऱ्यावर जाण्याचा सपाटा लावला आहे. विदेश दौऱ्यास जाण्यासाठी त्यांनी जराही खंड पडू दिला नाही. कोरोना काळ वगळता ते महिना-दोन महिन्यांनी जगाच्या कोणत्या तरी देशाचा दौरा करत आलेले आहेत. 2025 या नव्या वर्षात पुन्हा एकदा ते अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत.

येत्या 13 फेब्रुवारीला ते वॉशिंग्टन डीसी येथे भेट देणार आहेत. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी सर्वात जास्त अमेरिकेचे दौरे केले आहेत. पंतप्रधान यांच्या एक किंवा दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी कोटय़वधी रुपयांचा खर्च होतो. हिंदुस्थान आणि अमेरिका या दोन देशांतील संबंध सध्या म्हणावे तसे चांगले राहिलेले नाहीत. मोदी हे ट्रम्प यांना मित्र म्हणत असले तरी ट्रम्प यांनी 20 जानेवारीला झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधीला नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवले नाही.

2024 मधील विदेश दौरे

  • 21 ते 22 डिसेंबर कुवेत
  • 16 ते 22 नोव्हेंबर – नायजेरिया, ब्राझील
  • 22 ते 23 ऑक्टोबर रशिया
  • 10 ते 11 ऑक्टोबर लाओस
  • 6 ते 7 सप्टेंबर इंडोनेशिया
  • 21 ते 24 सप्टेंबर यूएसए
  • 21 ते 23 ऑगस्ट पोलंड, युव्रेन
  • 8 जुलै ते 10 जुलै रशिया, ऑस्ट्रेलिया
  • 13 ते 13 जून इटली
  • 22 ते 23 मार्च भूतान
  • 13 ते 15 फेब्रुवारी यूएई, कतार