पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; नौदल युद्धनौकांचे राष्ट्रार्पण, इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईच्या नौदल गोदीत आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर या नौदल युद्धनौकांचे राष्ट्रार्पण त्यांच्या हस्ते केले जाणार आहे. त्यानंतर खारघर येथील इस्कॉन मंदिराचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

आयएनएस सुरत (पी 15बी) हे क्षेपणास्त्र विनाशिका प्रकल्पातील चौथे आणि सर्वोत्तम जहाज असून, जगातील सर्वात मोठय़ा, सर्वात अत्याधुनिक किनाशिकांपैकी एक आहे. अत्याधुनिक शस्त्र-सेन्सर पॅकेजेस आणि प्रगत नेटकर्क-केंद्रित क्षमतांनी सुसज्ज अशा या जहाजाकरील 75 टक्के सामग्री स्कदेशी आहे. आयएनएस निलगिरी (पी 17ए) हे हिंदुस्थानी नौदलाने निर्माण केलेले ’स्टेल्थ प्रिगेट’ प्रकारातील पहिले जहाज आहे. त्यात संकटकाळी तगून रहाण्याची क्षमता आहे. आयएनएस वाघशीर (पी 75) ही स्कॉर्पीयन प्रकल्पाची सहावी पाणबुडी आहे. प्रान्स नौदलाच्या सहकार्याने तिची बांधणी करण्यात आली आहे.

नकी मुंबईतील खारघर येथील श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नऊ एकरांकर वसलेल्या या प्रकल्पात अनेक देवदेवतांची मंदिरे, वै दिक शिक्षणाचे केंद्र, कस्तुसंग्रहालय, सभागृह आणि उपचार केंद्र यांचा समाकेश आहे.