विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक एक्स्प्रेसने वेग वाढवला आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष जाण्यास वेळ अपुरा पडेल म्हणून मोदींनी भूमिपूजनाचा ऑनलाईन धडाका सुरू केला आहे. आज त्यांनी राज्यात 7 हजार 654 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांच्या कामांचे ऑनलाईन भूमिपूजन केले.
राज्यातील प्रत्येक मोठय़ा प्रकल्पाचे भूमिपूजन आणि उद्घाटनासाठी मिंधे सरकार पंतप्रधान मोदी यांच्या प्रतीक्षेत असते. परंतु निवडणूक तोंडावर आल्याने मोदींची वेळ मिळणे कठीण झाले आहे. हे प्रकल्प आम्हीच केले याचे श्रेय घेण्यासाठी आचारसंहितेपूर्वी त्यांचे भूमिपूजन करण्याचा घाट मिंधे सरकारने घातला आहे. त्यानुसार मोदींनी आज पुढील प्रकल्पांचे ऑनलाईन भूमिपूजन केले.
n मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशीम, अमरावती, भंडारा, गडचिरोली आणि अंबरनाथ येथील नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये
n नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाची नवीन एकीकृत टर्मिनल इमारत
n शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील नवीन टर्मिनल इमारत