डिजिटल अटकेसारखी फसवणूक टाळण्यासाठी प्रतीक्षा करा, विचार करा आणि नंतर अॅक्शन घ्या, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थानवासीयांना दिला. आज मन की बातचा 115 वा भाग सादर झाला, त्यानिमित्ताने त्यांनी संवाद साधला. मोदी पुढे म्हणाले, तुम्हाला कॉल येताच थांबा, घाबरू नका, शांत राहा, घाईघाईने पाऊल उचलू नका. तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका. स्क्रीन शॉट्स घ्या आणि रेकार्डिंग करा.
दुसरी पायरी म्हणजे विचार करा, कोणतीही सरकारी एजन्सी फोनवर धमकावत नाही, व्हिडीओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा पैसे मागत नाही. तसेच असेल तर समजून जा की, काहीतरी चूक आहे. यानंतर तिसरी पायरी म्हणजे, टेक अॅक्शन फॉलो करा. नॅशनल सायबर हेल्पलाइन 1930 डायल करा, असे मोदी यांनी सांगितले.अशी लोकं फोनवर असे वातावरण तयार करतात की, तुम्ही घाबरून जाता. परंतु, हे सगळं फ्रॉड आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.