पंतप्रधान मोदी सामान्य व्यक्ती नाही, ते तर ‘अवतार’; खासदार कंगना रनौतचे विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामान्य मनुष्य नाहीत, ते तर अवतार आहेत असे विधान भाजप खासदार कंगना रनौतने केले आहे. तसेच मोदी पंतप्रधान झाल्यापासून आपल्या देशात विकास सुरू झाला असेही रनौत म्हणाली.

एका सभेत बोलताना कंगना रनौत म्हणाली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामान्य मनुष्य नाहीत, ते तर अवतार आहेत. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले तेव्हापासून राजकारण बदललं. 2014 च्या पूर्वी आपण तर मतदानही नाही करायचो. तरुणांना राजकीय नेत्यांबाबत राग निर्माण झाला होता. 2014 पूर्वी सगळे मिळून देश खात होते, पण आता अशी वेळ आली आहे की आपण स्वतः राजकारणात आलो आहोत. आता आपल्याकडे मोदींसारखा पंतप्रधान आहे, मोदी आल्यापासून देशाचा विकास सुरू झाला असेही रनौत म्हणाली