किंमत 39 हजार, मायलेज 110km; ‘या’ आहेत जबरदस्त बजेट बाईक्स

नवीन वर्षात जर तुम्ही दैनंदिन वापरासाठी परवडणारी बाईक शोधत असाल, तर तुमच्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा 5 स्वस्त बाईक्सची माहिती सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला 110km चे जबरदस्त मायलेज मिळेल. या बाईकची किंमत 39,990 रुपयांपासून सुरू होते. या यादीत बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर, हीरो मोटोकॉर्प आणि होंडा यांच्या बाईक्सचा समावेश आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…

Tvs Sport

Tvs Sport ही 100cc बाईक सेगमेंटमध्ये सर्वात परवडणाऱ्या बाईकपैकी एक आहे. यात 110 cc चे इंजिन आहे. Asia Book of Records आणि India Book of Records नुसार, TVS Sport ने 110.12 मायलेज मिळवून मायलेजचा नवा विक्रम रचला आहे. ड्रम ब्रेक याच्या पुढील आणि मागील टायरमध्ये उपलब्ध आहेत. इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला बाईकमध्ये 110cc इंजिन मिळते, जे 8.29PS पॉवर आणि 8.7Nm टॉर्क जनरेट करते. यात 4 स्पीड गिअरबॉक्स आहे. या बाईकमध्ये 10 लिटरची इंधन टाकी आहे. दिल्लीत याची एक्स-शो रूम किंमत 59 हजार रुपयांपासून सुरू होते.

Honda Shine 100

Honda ची Shine 110 ही रोजच्या वापरासाठी चांगली बाईक आहे. या बाईकची एक्स-शो रूम किंमत 64900 रुपये आहे. या बाईकमध्ये 98.98 सीसी इंजिन आहे. या बाईकचे मायलेज 65 किलोमीटर प्रति लिटर आहे. याच्या साध्या डिझाईनमुळे, सर्व वयोगटातील लोक ही बाईक सहजपणे चालवू शकतात. याची सीट लांब आणि मऊ आहे. तुम्ही ही बाईक ताशी 70-80kmp च्या वेगाने चालवू शकता.

TVS XL

TVS XL100 ची किंमत 39900 रुपयांपासून सुरू होते, या बाईकमध्ये 99.7 cc 4 स्ट्रोक, सिंगल सिलेंडर इंजिन आहे. जे 4.3 bhp आणि 6.5 Nm टॉर्क जनरेट करते. ARAI नुसार, ही बाईक 80 किलोमीटरचा मायलेज देते.. XL 100 च्या माध्यमातून, कंपनी अशा ग्राहकांना लक्ष्य करते ज्यांना किफायतशीर आणि उपयुक्त दुचाकी खरेदी करायची आहे. याचे वजन कमी असल्यामुळे तुम्ही जड ट्रॅफिकमध्येही ती सहज चालवू शकता.