मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट, मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारचे पाऊल

मणिपूर राज्यात केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे. गृहमंत्रालयाने अधिसूचना जारी करून राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसरी व्यक्ती मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईल अशी शक्यता होती. दरम्यान केंद्र सरकारने राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा
9 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला आणि सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांची राजभवनात आज बैठक पार पडली. यावेळी राज्यात सैन्य कुठे तैनात करण्यात आले आहे याची माहिती दिली गेली.