राष्ट्रपती मुर्मू चार दिवसांच्या विदेश दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या चार दिवसांच्या विदेश दौऱ्यावर गेल्या आहेत. या चार दिवसांत त्या पोर्तुगाल आणि स्लोव्होकियाची राजधानी लिस्बनमध्ये असतील. 1998 नंतर हिंदुस्थानी राष्ट्रपतींचा हा पहिला पोर्तुगाल दौरा आहे. तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायण यांनी पोर्तुगालचा दौरा केला होता. मुर्मू 7 ते 9 एप्रिलपर्यंत येथे असतील. त्यानंतर 9 ते 10 एप्रिलदरम्यान मुर्मू स्लोव्होकियात असतील. 29 वर्षांनंतर हिंदुस्थानी राष्ट्रपती या ठिकाणी जात आहेत. यामुळे दोन्ही देशांचे संबंध आणखी दृढ होतील, असे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी म्हटले आहे.