पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा जळफळाट; पूर्ण ताकदीनं उत्तर देऊ, शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे. पाकिस्तानचे नेत हिंदुस्थानविरोधात गरळ ओकत आहेत. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाद शरीफ यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून हिंदुस्थानला युद्धाची धमकी दिली आहे. पाकिस्तानच्या हक्काचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण ताकदीने उत्तर दिले जाईल, अशी दर्पोक्ती शरीफ यांनी केली.

पाकिस्तानचे पाणी रोखण्याचा किंवा वळवण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास आम्ही त्याला पूर्ण ताकदीने उत्तर देऊ. आमचा देश 24 कोटी लोकांचा असून आम्ही आमच्या शूर सैन्य दलाच्या मागे उभे आहोत, असे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले.

हे वाचा – बलुचिस्तानमध्ये BLA चा मोठा हल्ला; आयईडी स्फोटाने पाकिस्तानी सैन्याचा ताफा उडवला, 10 सैनिक ठार

शांतता हीच आमची प्राथमिकता आहे. पण पाकिस्तान कोणत्याही तटस्थ संवादात सहभागी होण्यास तयार आहे, असे म्हणत शरीफ यांनी पाकिस्तानच्या अखंडतेशी आणि सुरक्षेशी कधीही तडजोड करणार नाही, असेही ते म्हणाले. तसेच देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी सैन्य पूर्णपणे सक्षम व सज्ज आहे, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे हिंदुस्थानला उघड उघड धमकीच दिली.

सिंधू नदी आमचीच! खोऱ्यात एकतर आमचं पाणी वाहेल किंवा त्यांचं रक्त, बिलावल भुट्टोंची हिंदुस्थानला पोकळ धमकी