
आंतरराष्ट्रीय वत्ते आणि लेखक प्रेम रावत यांच्या ‘श्वास ः जीवन के प्रति जागरूक हों’ या पुस्तकाचे प्रकाशन आज, रविवारी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे होणार आहे. हे पुस्तक त्यांच्या ‘ब्रेथ’ या इंग्रजी पुस्तकाचा हिंदी अनुवाद आहे. याद्वारे लेखकाचा तिसऱ्यांदा गिनीज वर्ल्ड रेकाॉर्ड करण्याचा प्रयत्न असेल. प्रेम रावत यांच्याकडे आधीच दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद आहे. लेखक स्वतः पायलट आहेत. 26 नोव्हेंबर 2023 रोजी गया येथे झालेल्या प्रेम रावत यांच्या व्याख्यानाला 3,75,000 लोकांनी हजेरी लावली होती.