
पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे उपचाराअभावी एका गर्भवती महिलेला जीव गमवावा लागल. यामुळे पुणेकर संतप्त झाले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही तीव्र संताप व्यक्त करत धर्मादाय आयुक्त कार्यालयात आंदोलन केलं आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर करवूं झाली नाही तर, आम्ही तीव्र आंदोलन करू, अशा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला आहे.
दरम्यान, तनिषा भिसे यांना बुधवारी प्रसुतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी आणले होते. मात्र, क्रिटीकल शस्त्रक्रिया असल्यामुळे रुग्णालयाने तत्काळ दहा लाख रुपये भरण्यास सांगितले. आम्ही अडीच लाख रुपये आता भरतो, उर्वरित पैसे लगेच भरले जातील असे नातेवाईकांनी सांगितले. परंतु, प्रशासनाने ऐकले नाही. त्यामुळे तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले. रूग्णालयाच्या मुजोरपणामुळे तनिषा यांचा मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे.