मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या निधनानंतर त्याला रूग्णालयात ठेवण्यात आलेला बेड गर्भवती पत्नीकडून साफ करून घेतल्याची घटना दिंडोरीतल जिल्हा रूग्णालयात घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये गर्भवती महिला बेड साफ करताना दिसत आहेत. तसेच रुग्णालयातील कर्मचारी तिला सूचना करताना आणि पाण्याची बॉटल देताना दिसत आहेत. मात्र रुग्णालय प्रशासनाने महिलेला बेड साफ करायला लावल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. महिलेला बेड साफ करायला सांगितला नव्हता. महिला स्वतः पतीच्या रक्ताचे नमुने घेत होती, असे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगतिले.
जनिमीच्या वादातून महिलेचा पती,तिचे दोन दिर आणि सासऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात महिलेचा सासरा आणि दोन दीर यांचा जागीच मृत्यू झाला. तर महिलेचा पती रामराज मारवी हा गंभीर जखमी झाला.
रामराजला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रामराजच्या मृत्यूनंतर त्याला ज्या बेडवर ठेवण्यात आले होते, तो बेड रुग्णालयातील कर्मचाऱ्याला त्याच्या पत्नीला साफ करायला लावला. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ही सर्व प्रकार उघडकीस आला.