प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसणार ‘प्रलय’ मिसाईल

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पहिल्यांदाच ‘प्रलय’ मिसाईलचा समावेश करण्यात आला आहे. हे क्षेपणास्त्र डीआरडीओ अर्थात संशोधन, संरक्षण आणि विकास संस्थेने तयार केले असून हे शत्रूच्या मनात धडकी भरवणारे आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱया या क्षेपणास्त्राची झलक यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर आयोजित संचलनात दिसणार आहे, अशी माहिती संरक्षण सचिव राकेश कुमार सिंह यांनी दिली. यंदाच्या संचलनात स्वदेशीवर भर देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची सुरुवात हिंदुस्थानी वाद्यांच्या वादनाने होईल. यात तब्बल 300 कलाकार सहभागी होणार असल्याचे राकेश कुमार सिंह यांनी सांगितले.