प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळय़ात आयआयटीयन्सच्या किचनची चर्चा आहे. आयआयटीयन्सचा असा एक ग्रुप आहे जो दररोज कुंभमेळय़ात येणाऱ्या एक लाखापेक्षा जास्त भाविकांना महाप्रसादाचे वाटप करत आहे. दररोजच्या मेन्यूपासून किचनच्या डिझायनिंगपर्यंत साऱयामध्ये इंजिनीअरिंग दिसून येतंय. महाकुंभमेळय़ातील आयआयटीयन्स किचनमध्ये 500 जणांची टीम एकदम सहजतेने काम करते. यामागे आयआयटी मुंबईचे पास आऊट गौरांग प्रभू आणि त्यांच्या सहकाऱयांचा हात आहे. त्यांनी रेसिपीपासून किचनचे डिझाईन तयार केलंय. मोठय़ा प्रमाणात भोजन तयार करणे आणि त्याचे वाटप करण्यासाठी ट्रेनच्या रुळांचा वापर केलाय. मोठय़ा मोठय़ा भांडय़ांमधील जेवण सहजतेने पोचेल. भाविकांना डाळ, भात, चपाती, तीन प्रकारच्या भाज्या, हलवा, बर्फी असा महाप्रसाद दिला जातो. मशीनमध्ये एका तासाला पाच हजार चपात्या बनवल्या जाऊ शकतात.