मूळ भाडेकरू, मालकांचा हक्क राखूनच पुनर्विकास

गिरगाव, ताडदेवसह मुंबईतील जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना मूळ भाडेकरू आणि मालकांच्या हक्काचे संरक्षण करूनच इमारतींचा पुनर्विकास करण्यात येईल. कोणालाही बेघर होऊ देणार नाही. इमारतीच्या मालकांनी सहकार्य केले नाही तर विशेष नियम, कायदा बनवून रहिवाशांना संरक्षित केले जाईल तसेच भाडेकरूंच्या पुनर्विकासासाठी जास्तीचा एफएसआय द्यावा लागला तरी तो देण्याची तरतूद करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी गिरगाव-ताडदेवमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती.