थायलंडमध्ये साकारणार प्रति दगडूशेठ मंदिर

श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा केवळ पुण्यातच नाही संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे मंदिर थायलंड येथील फुकेतमध्ये उभारले आहे. या मंदिरात दगडूशेठ गणपती बाप्पांची विधिवत स्थापना येणार आहे. फुकेत येथे स्थापन करण्यात येणाऱ्या दगडूशेठ बाप्पाच्या मूर्तीची लाल महाल ते दगडूशेठ गणपती मंदीर अशी मिरवणूक काढण्यात आली.

पुण्यात झालेल्या विधिवत पूजन कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण, राजू सांकला, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे, ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी चेतन लोढा यावेळी उपस्थित होते. मूर्तीच्या पूजनासाठी फुकेत-9 रियल इस्टेट कंपनीच्या अध्यक्षा पापा सॉन मिपा यावेळी उपस्थित होत्या. मिपा यांच्या पुढाकाराने थायलंडमध्ये हे मंदिर उभे करण्यात आले.

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने आम्हालाही शक्ती मिळते. फुकेतमध्ये मंदिर उभारणे हे अशक्यप्राय वाटत होते. मात्र, दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि हिंदुस्थानींच्या सहकार्यामुळे हे शक्य होत आहे. आमचे प्रधानमंत्रीदेखील सुरू असलेल्या मंदिराचे कार्य पाहत असल्याचे मिपा यांनी सांगितले.