प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले. यावेळी तणाव निर्माण झाला. दरम्यान, सहदिवाणी न्यायाधीश एस. एस. तट यांनी कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.