
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणाऱ्या प्रशांत कोरटकरला पोलिसांनी अटक केली आहे. कोरटकरला आज कोल्हापूर न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रशांत कोरटकरला कोणी कोणी मदत केली त्यांनाही अटक करा अशी मागणी इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी केली आहे.
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर प्रशांत कोरटकर हा फरार झाला होता. सोमवारी कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरला तेलंगाणा राज्यातून अटक केली होती. आज कोरटकरला पोलिलांनी हजर केले. पोलिसांनी कोरटकरची सात दिवसांसाठी कोठडी मागितली होती. न्यायालयाने कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे म्हणाले की फक्त कोरटकरच नाही तर, तर कोरटकरला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना अटक झाली पाहिजे. फरार झाल्यानंतर कोरटकर काय खात होता याचाही तपास झाला पाहिजे, कारण कोरटकरच्या विधानाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट होती. तेव्हा कोरटकर आणि त्याचे सहकार्य काय मजा करत होते हे महाराष्ट्राला कळाले पाहिजे असेही सरोदे म्हणाले.