शिवशंभूद्रोही कोरटकरने पळून जाण्यासाठी वापरलेली गाडी कोल्हापूर पोलिसांकडून जप्त

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देत, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर गरळ ओकून‌ गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या नागपूरच्या शिवशंभूद्रोही प्रशांत कोरटकरने वापरलेली चारचाकी गाडी आता कोल्हापूर पोलिसांकडून आता जप्त करण्यात आली आहे. ही गाडी चंद्रपूरहून ताब्यात घेऊन कोल्हापुरात आणली आहे. कोरटकरला चंद्रपूर होऊन तेलंगणाकडे जाण्यासाठी धीरज चौधरी नावाच्या व्यक्तीने मदत केल्याचा आरोप असून त्याची ही गाडी कोल्हापूर पोलिसांनी जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान काल कोरटकरला 30 मार्चपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपत असल्याने,उद्या रविवारी त्याला पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा तसेच महिनिभर पळुन गेलेल्या प्रशांत कोरटकरच्या कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून मुसक्या आवळल्या असुन,सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. कोरटकरची तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने,काल त्याला पुन्हा येथील न्यायालयात हजर केले असता,उद्या दि. 30 मार्च पर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.कोल्हापूर पोलीस कोरटकर ला शोधत असताना पळून गेलेल्या काळात कोरटकरला बुकीमालक धीरज चौधरीसह,प्रशिक पडवेकर, हिफायत अली, राजेंद्र जोशी, साईराज पेटकर यांनी मदत केली असल्याचे कोरटकरने पोलिस चौकशीत सांगितल्याचे काल न्यायालयासमोर सांगण्यात आले होते. यामुळे पुढील तपासासाठी कोरटकर ला आणखी दोन दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. पळुन गेलेल्या काळात कोरटकरने कोणतेही डिजिटल ट्रांजेक्शन त्याने केले नाहीत,कोणताही फोन त्याने वापरला नाही, यामुळे त्याला कोणी कोणी मदत केली या संदर्भातील माहिती पोलीस तपासात घेत असून आणखी अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे

दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोरटकर पोलिसांना चकवा देत पळून गेला होता.या काळात तो चंद्रपूरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.पण कोल्हापूर पोलिसांचे एक पथक दाखल होण्याआधीच तो चंद्रपूरमधून तेलंगणात पसार झाला होता.यावेळी धीरज चौधरी नावाच्या व्यक्तीने त्याला गाडी दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली.कोल्हापूर पोलिसांनी अधिक तपासासाठी चंद्रपूरहून ती महिंद्रा एक्सयूव्ही गाडी काल जप्त करून,कोल्हापुरात आणली.पोलीस मुख्यालयात ही गाडी लावण्यात आली होती.पण आता सुरक्षेच्या कारणास्तव ही गाडी अज्ञात स्थळी नेण्यात आली आहे.