राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आपला पक्ष स्थापन केला आहे. त्यानंतर बिहारच्या राजकारणात त्यांची चर्चा होत आहे. पोटनिवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नसली तरी मतांची टक्केवारी चांगली आहे. आता प्रशांत किशोर यांनी बीपीएससीच्या परीक्षार्थिंचा मुद्दा उचलून धरत 70 व्या प्राथमिक परीक्षेला रद्द करण्याच्या मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना सशर्त जामीनाची परवानगी देण्यात आली. मात्र, त्यांनी जामीन घेण्यास नकार देत तुरुंगातूनच उपोषण सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे.
बिहारच्या राजकारणात प्रशांत किशोर यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण करत आहेत. त्यांनी बीपीएससीच्या 70 व्या प्राथमिक परीक्षेला रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना सशर्त जामीन घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली. मात्र, त्यांनी जामीन घेण्यास नकार देत तुरुंगातूनच उपोषण सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. प्रशांत किशोर यांनी आंदोलन आणि उपोषण करू नये, या अटीवर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.
प्रशांत किशोर यांना गांधी मैदान येथील उपोषण स्थळावरून सोमवारी पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता प्रशांत किशोर यांनी जामिनासाठीचा बॉण्ड भरण्यास नकार दिला. त्यानंतर प्रशांत किशोर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाच्या परिसरातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तुरुंगातूनच आमरण उपोषण सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता आपल्याला थांबायचं नाही, जर थांबलो तर सरकारची हिंमत वाढेल. त्यामुळे मी जामीनसुद्धा घेणार नाही. तसेच उपोषणही सोडणार नाही. प्रशासनाला जे काही करायचं आहे ते करू दे. यांना वाटलं की उचलून नेलं आणि जामीन दिला की, संपूर्ण प्रकरण संपेल. मात्र, आपण आपल्या उपोषणावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.