बिहार लोकसेवा आयोगाची (BPSC) परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणारे जन सूरज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांना पाटणा पोलिसांनी सोमवारी पहाटे ताब्यात घेतलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत किशोर यांना पाटण्यातील गांधी मैदानातून ‘जबरदस्तीने काढून टाकण्यात आले आणि ॲम्ब्युलन्समध्ये एम्समध्ये नेण्यात आले’.