भाजपने बनवले बोगस मतदार, खटला चालवण्याची वकील प्रशांत भुषण यांची मागणी

भाजप खासदारांच्या निवासस्थानातून मतदारयादीत बोगस मतदार घुसवले जात आहे असा आरोप आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी केला होता. ज्येष्ठ वकील प्रशांत भुषण यांनी अशा लोकांवर खटला दाखल केला पाहिजे अशी मागणी केली आहे.

संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेतल होती. त्यात सिंह म्हणाले की, सिंह म्हणाले की प्रवेश वर्मा हे माजी खासदार आहे. तरी मे पासून जानेवारीपर्यंत 8 महिन्यांपासून खासदारांच्या बंगल्यावर कब्जा केला आहे. वर्मा यांनी यांच बंगल्यावर 33 मतदारांचे नाव टाकण्याचा अर्ज दिला आहे.

ही बातमी रीट्विट करत ज्येष्ठ वकील म्हणाले की, ही लोकशाहीशी बेईमानी असून आणि गंभीर गुन्हा आहे. या लोकांवर खटले दाखल केले पाहिजे अशी मागणी भुषण यांनी केली.