
जुन्नर तालुक्यातील उंब्रज नं. 2 येथील वै. ह.भ.प. सावळे रामबुवा दांगट यांच्या कृपाशीर्वादाने उंब्रज ग्रामवासीयांचे श्रद्धास्थान श्री बजरंगबली हनुमान व श्री शनैश्वर महाराज आणि पावशादेव या दैवतांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा शनिवार, 12 एप्रिल रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. पंचक्रोशीतील तसेच पुणे, मुंबईतील भाविकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या सोहळ्याला उद्योजक बाजीराव दांगट, जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट, आधार पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष भरतशेठ दांगट, वैष्णव सांप्रदायिक ह.भ.प. केशव महाराज हागवणे श्री क्षेत्र देहू, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, जुन्नर आंबेगावच्या वि. सह. सा. कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, माजी आमदार अतुल बेनके, पुण्यातील मा. सदस्य जिल्हा परिषद मोहित ढमाले, उपजिल्हाधिकारी शिवाजीराव दावभट, सामाजिक विचारवंत शिवाजीराव निलख, साईदीप इंडस्ट्रीजचे गणेश हांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.