माँ माली… बाप तेली… बेटा निकला सय्यद अली… असं वादग्रस्त वक्तव्य मनसेच्या प्रकाश महाजन यांनी केलं होतं. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या वक्तव्यानंतर तेली समाजाने संताप व्यक्त केला होता. माफी मागावी, अशी मागणी केली होती. यानंतर अखेर प्रकाश महाजन यांनी माफी मागितली आहे.
आपल्या ग्रामीण भागात अशा खूप म्हणी आहेत. त्या योग्य की अयोग्य हा विषय वेगळा आहे. प्रत्येक जातीचे वैशिष्ट्य दोष यावरही म्हणी तयार झाल्या आहेत. ती म्हण वापरली. पण कुठल्याही समाजाचं मन दुखाववं हा त्यामागचा हेतू नव्हता. समजा कुणाचं मन दुखावलं असेल तर मी जाहीर माफी मागतो. तो एक यमक जुळवण्याचा प्रकार आहे. त्याकडे त्याच अर्थाने बघितलं गेलं पाहिजे. फार गांभीर्याने घेण्यासारखं नाही. पण तरी कुणाच्या भावना दुखत असतील तर मी हृदयपूर्वक त्यांची माफी मागतो, असे प्रकाश महाजन म्हणाले.