मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, प्रकाश आंबेडकर यांची मागणी

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, परंतु ते ओबीसींच्या ताटातून नव्हे तर स्वतंत्ररीत्या आरक्षण देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

25 जुलैपासून सुरू होणाऱया आरक्षण बचाव यात्रेच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज नांदेडात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, दादर येथे चैत्यभूमीला अभिवादन करून आरक्षण बचाव यात्रा सुरू होणार असल्याचे ते म्हणाले.