सेक्स स्कँडल प्रकरणात अडकलेले प्रज्ज्वल रेवन्ना जर्मनीला कसे काय पळाले? परराष्ट्र मंत्रालयानं दिलं स्पष्टीकरण

सेक्स स्कँडल प्रकरण उघड होताच कर्नाटकमधील विद्यमान खासदार आणि हासन लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रज्ज्वल रेवन्ना हे जर्मनीला पळून गेल्याचं सांगण्यात येत आहे. प्रज्ज्वल रेवन्ना यांना धर्मनिरपेक्ष जनता दलाने (जेडीएस) पक्षातून निलंबित केलं आहे. पण प्रज्ज्वल रेवन्ना यांना देशाबाहेर पळवण्यात केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारने मदत केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. विरोधकांच्या आरोपांनंतर परराष्ट्र मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणी मोजक्याच शब्दात उत्तर दिलं आहे. खासदार प्रज्ज्वल रेवन्ना परराष्ट्र मंत्रालयाकडून कुठलाही व्हिसा जारी करण्यात आलेला नाही, असं मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. खासदाराने जर्मनी प्रवासाबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून कुठलीही राजनीतीक मंजुरी मागितली नव्हती आणि मंत्रालयाने अशी कुठलीही मंजुरी दिलेली नाही. यामुळे कुठलीही व्हिसा नोटही जारी केलेली नव्हती, असं त्यांनी स्पष्ट केलं. मंत्रालयाने खासदार प्रज्ज्वल रेवन्ना यांच्यासाठी इतर कुठल्याही देशाला व्हिसा नोटही जारी केलेली नाही. मात्र, त्यांनी राजकीय पासपोर्टवर प्रवास केला होता, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

सेक्स टेप लीक करणारा प्रज्ज्वल रेवन्नाचा ड्रायव्हर बेपत्ता

प्रज्ज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्यावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आज परराष्ट्र मंत्रालयाचं या प्रकरणी स्पष्टीकरण आलं आहे. प्रज्ज्वल रेवन्ना यांचा राजनीतीक पासपोर्ट रद्द करा आणि राजनीतीक आणि पोलीस पर्यायांचा उपयोग करून त्यांना मायदेशात आणण्याची मागणी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी पत्रातून केली होती.

बलात्काऱ्याला देशाबाहेर पळू देणं हीच मोदींची गॅरंटी, राहुल गांधी यांचा हल्लाबोल