![Annual get-together](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Annual-get-together-696x447.jpg)
कुर्ला येथील प्रबोधन कुर्ला पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच राजे शिवछत्रपती क्रीडांगण येथे मोठय़ा उत्साहात पार पडला. पक्ष्यांविषयी समाजामध्ये जाणीव, जागृती निर्माण व्हावी यासाठी या वर्षी ‘पक्षी’ या विषयावर आधारित 15 नृत्ये विद्यार्थ्यांनी सादर केली. यामध्ये 250 विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्नेहसंमेलनाला अभिनेते संजय मोने, नीलेश गोपनारायण, नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे, अश्विन मेश्राम, प्रेमसागर मेस्त्री, रामदास भोसले, भालचंद्र दळवी, प्रमोद मोराजकर, अजय शुक्ला, अनिल गलगली, संस्थेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपनेते भाऊ कोरगावकर, विश्वस्त शलाका कोरगावकर, जयदीप हांडे, नीलेश कोरगावकर, मुख्याध्यापिका विद्या फलके, विशाखा परब उपस्थित होते. किरण व वैशाली वावरे तसेच साईनाथ व महानंदा बनसोडे यांना आदर्श पालक म्हणून, तर कृतिशील शिक्षक म्हणून विभावरी शिरगावकर (पूर्व प्राथमिक), शुभांगी मेमाणे (प्राथमिक) आणि सुदर्शन शिर्के (माध्यमिक) यांना सन्मानित करण्यात आले.