खोपोली येथील ‘रमाधाम’मधील ज्येष्ठांच्या तंदुरुस्तीसाठी प्रबोधन गोरेगाव या संस्थेने व्यायामाची साधने आणि मराठी पुस्तकांची भेट दिली. यामुळे ‘रमाधाम’मधील ज्येष्ठांच्या आनंददायी जीवनाचा अनुभव द्विगुणित झाला आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या संकल्पनेतून खोपोली येथील रमाधाम वृद्धाश्रम साकारले आहे. आयुष्यातले चढउतार, अडचणी, आव्हाने हे सगळं यशस्वीपणे पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एक समाधानी, शांत आणि संपूर्ण असे आयुष्य जगता यावे, या हेतूने ‘रमाधाम’ची निर्मिती केली गेली. रमाधाम परिवाराच्या तंदुरुस्तीसाठी आणि आनंदी जीवनासाठी आज खुल्या जागेतील व्यायामाची साधने सुरू करण्यात आली. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, रमाधामचे अध्यक्ष चंद्रकांत वैद्य व प्रबोधनचे रमेश इस्वलकर उपस्थित होते.