प्रभाकर पवार यांच्या ‘थरार’ पुस्तकाचे आज प्रकाशन, उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती

ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांच्या ‘मी पाहिलेला तीन दशकांतील थरार’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी सायंकाळी 4.30 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘थरार’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

पुस्तक प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक-पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, दै. ‘सामना’चे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत, माजी खासदार-पद्मश्री कुमार केतकर, खासदार अरविंद सावंत, मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रभाकर पवार यांनी तीन दशकांहून अधिक काळ गुन्हे पत्रकारिता केली आहे. त्यांनी अंडरवर्ल्ड गुन्हेगारीच्या थरारावर आधारित ‘मी पाहिलेला तीन दशकांतील थरार’ पुस्तक लिहिले आहे. हे त्यांचे दहावे गुन्हेविषयक पुस्तक आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पप्पू प्राची प्रकाशनच्या प्राची पवार यांनी केले आहे.