Nagar मोठी बातमी! राज्य कबड्डीच्या असोसिएशनच्या निवडणुकीला स्थगिती

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या 21 जुलैला होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. या निवडणुकीला स्थगिती मिळावी व क्रीडा संहितेचे पालन व्हावे म्हणून खासदार नीलेश लंके व सच्चिदानंद भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, कार्यकारी समितीची वयोमर्यादा, कार्यकाल मर्यादा व मतदानाच्या हक्काबाबत क्रीडा संहितेचे पालन होत नसल्याबाबत सातारा जिल्हा हौशी कबड्डी संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या दोन्ही संघटनांच्या याचिकेवर गुरुवारी 18 रोजी सुनावणी होणार होती; परंतु उच्च न्यायालयाने ही सुनावणी शुक्रवारी 19 रोजी होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार नगर जिल्हा हौशी कबड्डी व सातारा जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या याचिकेवर सुनावणी करताना राज्य कबड्डी असोसिएशनची होणाऱ्या निवडणुकीस स्थगिती दिली आहे.