देशातील पोस्ट खात्यात तब्बल 44 हजार 228 पदासाठी मेगा भरती करण्यात येणार आहे. ग्रामीण डाक सेवा (जीडीएस) पदासाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे. 15 जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 5 ऑगस्ट 2024 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. नोकरीसाठी उमेदवार indianpostgdsonline.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू शकता. महाराष्ट्र, गुजरात, बिहार, दिल्लीसह 22 राज्यांत ही भरती होणार आहे. नोकरीसाठी लागणारी पात्रता, शिक्षण, पगार आणि अन्य सविस्तर माहिती पोस्टाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.