पॉर्नस्टार रिया बर्डेला वाचवण्यासाठी वकिलांची फौज, दीड तास चालली सुनावणी

उल्हासनगरमधून पॉर्न स्टार रिया बर्डेला पोलिसांनी अटक केली होती. रिया बर्डे मुळची बांगलादेशची रहिवासी असून खोट्या कागदपत्रांवर ती हिंदुस्थानात राहत होती असा तिच्यावर आरोप आहे. पण कोर्टात रियासाठी वकिलांची फौजच उभी होती. या वकिलांनी रियाची बाजू मांडली आणि तिची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला.

रिया बर्डेच्या अटकेचा तिच्या वकिलांनी विरोध केला. रिया बांगलादेशी आहे याचे काय पुरावे आहेत असा सवाल वकिलांनी पोलिसांना केला. तब्बल तीन तास कोर्टात यावर खडाजंगी झाली. त्यानंतर न्यायाधीशांनी 1 ऑक्टोबरपर्यंतर रियाला पोलीस कोठडी सुनावली. खोट्या कागतपत्रांच्या आधारे हिंदुस्थानी पासपोर्ट बनवल्याच्या आरोपाखाली रिया बर्डेला 26 सप्टेंबरला अटक करण्यात आली होती.

वर्षभरापूर्वी रियाची चौकशी सुरू झाली होती. रियाचे जन्माचा दाखला, लिव्हिंग सर्टिफिकेट आणि पासपोर्टवरचा पत्ता जुळत नव्हता. सर्व कागतपत्रांवर वेगवेगळ्या राज्यांचा पत्ता होता. रियाने खोटी शैक्षणिक कागदपत्र बनवून पासपोर्ट बनवल्याचा आरोप होता. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.