
पोप फ्रान्सिस यांची प्रकृती गंभीर असल्याचे व्हॅटिकनने शनिवारी सांगितले. 88 वर्षीय पोप याना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी ऑक्सिजन पुरवठ्याची आणि रक्त संक्रमणाची गरज होती. त्यांच्यावर उपचार सुरू असून अजूनही त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे व्हॉटिकनने म्हटले आहे.
पोप फ्रन्सिस यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. त्यांच्यावरील धोका अद्याप टळला नसल्याचे व्हॅटिकनने त्यांच्या संध्याकाळच्या पोप यांच्या प्रकृतीबाबतच्या अपडेटमध्ये म्हटले आहे. सकाळी पोप फ्रान्सिस यांना दीर्घकाळ दम्याचा आणि श्वसनाचा त्रास होता. त्यासाठी त्यांना कृत्रीम ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे. त्यांच्या रक्त चाचण्यांमध्ये अॅनिमियाशी संबंधित थ्रोम्बोसाइटोपेनिया दिसून आला आहे.
पोप फ्रान्सिस यांना 14 फेब्रुवारी रोजी ब्राँकायटिसमुळे रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्यूमोनियाचा प्रादुर्भाव दिसत असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.