पोप फ्रान्सिस यांची प्रकृती गंभीर, रुग्णालयात व्हॅटिकनच्या राज्य सचिवांशी चर्चा

डबल न्यूमोनियामुळे रुग्णालयात दाखल असलेले ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस (88) यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशातच त्यांनी आज रुग्णालयात व्हॅटिकनच्या राज्य सचिवांशी भेटून नवीन पोप निवडण्याच्या आदेशांना मान्यता दिली. तसेच ही पदवी प्रदान करण्यासाठी औपचारिक बैठकीच्या तारखांवरही चर्चा झाली, असे व्हॅटिकनने सांगितले. पोप फ्रान्सिस हे रोमन पॅथोलिक चर्चचे प्रमुख आहेत.

आरोग्याच्या कारणास्तव पोप फ्रान्सिस लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात अशी अटकळ बांधली जात आहे. माजी पोप यांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे कारण देत 2013 मध्ये आपले पद सोडले होते. त्यानंतर फ्रान्सिस यांना पोप बनवण्यात आले होते. आता फ्रान्सिसदेखील प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदावरून पायउतार होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते आरोग्यविषयक समस्यांचा सामना करत आहेत.