पोप फ्रान्सिस यांना 5 आठवडय़ानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज

पॅथॉलिक ईसाई धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांना आज तब्बल 5 आठवडय़ांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर त्यांनी रुग्णालयातील बाल्कनीतून समर्थकांचे हात उंचावून आभार मानले. 88 वर्षांचे पोप फ्रान्सिस यांच्या फुफुसात संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना 14 फेब्रुवारी रोजी रोम येथील जेमेली रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर न्यूमोनिया आणि ऑनिमियावरील उपचारही सुरू होते. उपचाचारादरम्यान पॅथॉलिक चर्चचे मुख्यालय व्हेटिकनने पोप यांच्या रक्तचाचणीनंतर त्यांची किडनी फेल होण्याचे लक्षण दिसत असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांच्या प्लेटलेट्सही कमी झाल्याचे स्पष्ट केले होते.