पोप फ्रान्सिस यांचे निधन, 88 व्या वर्षी व्हॅटिकन सिटीमध्ये घेतला अखेरचा श्वास

रोमन कॅथलिक चर्चचे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले आहे. ते 88 वर्षांचे होते. व्हॅटिक सिटीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. व्हॅटिकनने व्हिडीओ शेअर करून ही माहिती दिली आहे.

गेल्या 12 वर्षांपासून त्यांना अनेक व्याधी होत्या अशी माहिती व्हॅटिकनने दिली आहे. रविवारी झालेल्या इस्टर संडेच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी 35 हजार लोक चर्चच्या प्रांगणात उपस्थित होते. शुभेच्छा देताना पोप म्हणाले होते की धार्मिक स्वातंत्र्य विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याशिवाय शांती प्रस्थापित करता येत नाही. तसेच गाझात झालेल्या घडामोडीचा त्यांनी निषेधही केला.