
भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी अर्थतज्ज्ञ पूनम गुप्ता यांची डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली. गुप्ता यांची नियुक्ती 7 ते 9 एप्रिल 2025 दरम्यान होणाऱ्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीपूर्वी झाली आहे. ही बैठक दर दोन महिन्यांच्या अंतराने होते. गुप्ता बो तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी हे पद भूषवतील. गुप्ता सध्या नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चचे महासंचालक म्हणून काम पाहत आहेत.
पूनम गुप्ता या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य देखील आहेत आणि 16 व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेचे संयोजक म्हणून काम करतात. गुप्ता या 2021 मध्ये एनसीएईआरमध्ये सामील झाल्या. याआधी गुप्ता यांनी वॉशिंग्टनमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेत महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.