पुण्याचे जिल्हाधिकारी दिवसे यांच्याविरुद्ध खेडकर यांची छळाची तक्रार

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळाची तक्रार दाखल केली आहे. वाशिमच्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांच्या पथकाने सोमवारी रात्री उशिरा तब्बल तीन तास पूजा खेडकर यांच्याकडे याबाबत चौकशी केली.

पूजा खेडकर यांच्या कारनाम्याचा अहवाल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य सरकारकडे पाठवल्यानंतर त्यांची वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली होती. दरम्यान खेडकर यांनी सुहास दिवसे यांच्या विरोधात वाशिम येथे छळाची तक्रार दाखल केली. या प्रकरणात वाशिम पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

वाशिम जिह्यातून कार्यमुक्त

पूजा खेडकर यांच्या महाराष्ट्रातील प्रशिक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश प्राप्त होताच वाशिम जिल्हाधिकाऱयांनी त्यांना कार्यमुक्त केले आहे.