वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिची उमेदवारी रद्द केल्यानंतर आता तिचा अटकपूर्व जामीन दिल्लीच्या पातियाळा न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकर यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
आलिशान कार आणि त्यावरील अंबर दिवा यामुळे वादात सापडलेल्या पूजा खेडकर हिचे एकामागून एक कारनामे उघडकीस आले होते. तिचे शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले होते. यूपीएससी आणि पंतप्रधान कार्यालयाने याची गंभीर दखल घेत यासंदर्भातील अहवाल मागवून खेडकर तिची चौकशी सुरू केली होती. त्यात ती दोषी आढळल्यानंतर यूपीएससीने पूजा खेडकर हिच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान पूजा खेडकर हिनी अटकपूर्व जामिनासाठी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात धाव घेतली होती. मात्र न्य़ायालयाने तिचा अटकपूर्व जामी अर्ज फेटाळला आहे.
पूजा ही 47 टक्के दिव्यांग असून यासंदर्भातील प्रमाणपत्र एम्सच्या बोर्डाने जारी केले आहे. हे प्रकरण यूपीएससीच्या कार्यकक्षेत येते आणि तिच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत, असा दावा पूजा खेडकच्या वकिलांनी कोर्टात करत अटकपूर्व जामिनाची मागणी केली आहे.