
पुजा हेगडे नेहमीच तीच्या अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांची पसंत बनली आहे. साउथ चित्रपटासोबतच बॉलिवुड मध्येही पुजाची चर्चा आहे. नुकत्याच सोशल मिडियावर तीने तीच्या आजीच्या कांजीवरम साडीतले फोटो शेअर केले आहे. त्यामध्ये अगदी साध्या लुकमध्ये पुजाच सौंदर्य खुललेलं दिसत आहे. या फोटोंसह पुजाने लग्नासाठी जाण्यापूर्वी घरात येणारा जास्मीनच्या फुलांचा ताजा वास आणि पहिल्या पावसानंतर ओल्या मातीच्या चिखलाचा सुगंध मला पुन्हा आठवला…अरे, साध्या गोष्टींमध्ये असलेले सौंदर्य. असे सुंदर कॅप्शन देखील दिले आहे.