Photo – मुंबईत सायन कोळीवाड्यात पोंगल सण साजरा

पोंगल (Pongal) सणाला 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीपासून सुरुवात झाली आहे. दक्षिण हिंदुस्थानात पोंगल सणाला विशेष महत्त्व आहे. नववर्षासमान असणारा हा सण दक्षिण हिंदुस्थानातील लोकं मोठ्या उत्साहात साजरा करतात. साधारण 4 दिवस पोंगल सणाचा उत्साह पहायला मिळतो.

(सर्व फोटो – रुपेश जाधव)

दक्षिण हिंदुस्थानातील लोकं रोजगाराच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यात विस्तारले आहेत. त्यामुळे देशभरात पोंगल सणाचा उत्साह पहायला मिळतो.

मुंबईतील सायन कोळीवाड्यामध्ये पोंगल सणानिमित्त दक्षिण हिंदुस्थानातील बांधवांची लगबग पहायला मिळाली. यावेळी त्यांनी चूल पेटवून नवीन भाताचा प्रसाद केला.

दक्षिण हिंदुस्थानात हा सण समृद्धीचे प्रतिक असल्याचे मानले जाते. त्यामुळे या दिवशी धानाचे पीक गोळा केले जाते.

तसेच येणारे पीकही चांगले यावे, यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते. देवाकडे प्रार्थना करून आणि आनंद व्यक्त करुणच पोंगल सण साजरा केला जातो.

पोंगल सणामध्ये चार दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात.

पहिल्या दिवशी सर्व प्रकारचा कचरा जाळला जातो, गोडधोडाचे जेवण केले जाते. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते, तिसऱ्या दिवशी गुरांजी पूजा केली जाते आणि चौथ्या दिवशी काली मातेची पूजा केली जाते.