प्रदूषणामुळे दिल्लीचा श्वास गुदमरला; दरवर्षी 12 हजार मृत्यू

देशातील 10 मोठय़ा शहरांमध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी सात टक्के मृत्यू प्रदूषित हवेमुळे होत आहेत. ही धक्कादायक माहिती लॅन्सेटच्या अहवालातून समोर आलीय. दिल्लीमध्ये तर परिस्थिती फारच बिघडली आहे. दिल्लीत प्रदूषणामुळे दरवर्षी 12 हजार लोकांचे मृत्यू होत आहेत. दिल्लीसह मोठय़ा शहरांमध्ये विषारी वायू लोकांच्या फुप्फुसांमध्ये जातेय. या पार्श्वभूमीवर लोकांचे प्राण वाचवण्यासाठी त्वरित उपाययोजनांची गरज अहवालातून व्यक्त करण्यात आलीय.

लेन्सेटच्या टीमने अनेक शास्त्रज्ञांसोबत हा अभ्यास केला. यामध्ये 36 लाख लोकांच्या मृत्यूचे विश्लेषण केले. संशोधकांनी अहमदाबाद, बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, पुणे, शिमला आणि वाराणसी येथील प्रदूषणाचा अभ्यास केला. या शहरांतील पीएम 2.5 मायक्रो पार्टिकल स्तराची पातळी अभ्यासली.

(जे कॅन्सरसाठी जबाबदार आहेत.) 2008 ते 2019 दरम्यान कमीत कमी 33 हजार लोकांचा जीव पीएम 2.5 पार्टिकलमुळे झाला आहे. या कालावधीत या 10 शहरांमध्ये एकूण 7.2 टक्के मृत्यू झाले आहेत. सर्वात जास्त दुष्परिणाम दिल्ली शहरावर दिसून येत आहे. वाहने आणि कारखान्यांतून येणारा विषारी धूर हे प्रमुख कारण आहे.

● दिल्लीमध्ये दरवर्षी सुमारे 12 हजार लोकांचा मृत्यू प्रदूषित हवेमुळे होणाऱया आजारांमुळे होतात. एकूण मृत्यूच्या 11.5 टक्के एवढे हे प्रमाण आहे. केवळ दिल्लीच नव्हे तर हिल स्टेशन असलेल्या शिमला शहराची परिस्थितीही बिघडली आहे. शिमल्यामध्येही मोठय़ा प्रमाणात प्रदूषण आहे.

● मुंबई, कोलकाता, चेन्नई येथे घातक पीएम 2.5 मुळे झालेले मृत्यू जास्त आहेत. प्रदूषणामुळे अहमदाबाद 2495, बंगळुरू 2102, चेन्नई 2870, दिल्ली 11964, हैदराबाद 1597, कोलकाता 4678, मुंबई 5091, पुणे 1367, वाराणसी 831 लोकांचा मृत्यू झाला.